सिडकोत हॉटेलमध्ये जेवताना घेरुन एकाची हत्या; टोळक्याचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 00:34 IST2023-04-26T00:00:46+5:302023-04-26T00:34:38+5:30
सिडको भागात झालेल्या या हल्याने संपूर्ण सिडको परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिडकोत हॉटेलमध्ये जेवताना घेरुन एकाची हत्या; टोळक्याचा हल्ला
नरेंद्र दांडगव्हाळ
नाशिक : येथील सावता नगर भागातील हॉटेल प्रयांशी येथे रात्री नऊ ते सवा नऊ वाजेच्या सुमारास जेवत असलेल्या चार जणांपैकी एकावर बाहेरून आलेल्या टोळक्याने दगडफेक करीत प्लेव्हर ब्लॉक डोक्यात मारुन परशुराम बाळासाहेब नजान ( २५रा.पाथर्डी फाटा) या युवकाची हत्या केल्याची घटना मंगळवारी( दि.25) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
सिडको भागात झालेल्या या हल्याने संपूर्ण सिडको परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर काही क्षणातच सिडकोत खून झाल्याची बातमी पसरली . घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत संशयतांच्या मार्गावर पोलिसांची विविध पथके पाठवली आहे. मारहाण करणारे संशयित कामटवाडे गाव येथील असल्याची माहिती समजते आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम बाळासाहेब नजान( २५ रा.पाथर्डी फाटा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी परिसरात बघायला मिळाली अंबड पोलीस ठाण्यासह युनिट एक व तसेच युनिट दोनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत होते.अद्याप हत्येचे कारण समजू शकले नसून यादृष्टीने पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
टोळी युध्दाची दुसरी घटना
दहा दिवसात सिडकोत मागील रविवारी (दि.१६) गोळीबार करून राकेश कोष्टी याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खुनाचा प्रकार समोर आल्याने सिडकोवात्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस प्रशासनाचा धाकच नसल्याने पोलीस यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. परशुराम याच्या छातीवर व डोक्यास जबर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात जाईपर्यत त्याचा मृत्यु झाल्याचे समजते . रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी माहिति घेण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
परशुराम व त्याचे साथीदार हॉटेलमध्ये जेवत असताना झालेल्या हल्ल्याची घटना परिसरतील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे तपास सुरू आहे.