साप जाळतोय म्हणत खून करून पत्नीचा मृतदेह जाळला; पतीच्या कबुलीने पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:37 IST2023-04-24T15:35:20+5:302023-04-24T15:37:07+5:30

आरोपी राधू पत्नी दयासोबत तिथे राहत होता. राधूची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती.

A husband killed his wife and burnt her body in Dhar, Madhya Pradesh | साप जाळतोय म्हणत खून करून पत्नीचा मृतदेह जाळला; पतीच्या कबुलीने पोलीस हैराण

साप जाळतोय म्हणत खून करून पत्नीचा मृतदेह जाळला; पतीच्या कबुलीने पोलीस हैराण

धार - पतीने पत्नीला बेदम मारले त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. मग मृतदेहाचं काय करायचा हा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह घरच्या मागील जागेस जाळण्याचं ठरवले तेही दुपारच्या वेळेत. घरच्या मागे पती पत्नीचा मृतदेह जाळत होता त्याच्यावर कुणाला संशयही आला नाही. जेव्हा शेजारच्यांनी विचारले तेव्हा साप जाळतोय असं म्हटलं. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि २४ तासांत सर्व खेळ संपला. 

मध्य प्रदेशच्या धार इथं पिपरीहुरा डेहर गावात ही भयानक घटना घडली आहे. आरोपी राधू पत्नी दयासोबत तिथे राहत होता. राधूची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. लोकांनी तिच्याबद्दल राधूला विचारणा केली तेव्हा ती नर्मदा परिक्रमा करण्यास गेल्याचं सांगण्यात आले. दयाच्या कुटुंबाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही दयाशी संपर्क झाला नाही. दुसरीकडे दयाबद्दल राधू सर्वांना वेगवेगळी कारणे सांगत होता. 

पतीनं दिली कबुली
काही दिवसांनंतर दयाच्या कुटुंबांने पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. पती राधूला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पतीने सांगितलेली घटना ऐकून पोलीसही हैराण झाले. राधू बनावट कहाणी ऐकवत होता. त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच राधूने आता दयाची केवळं हाडे शिल्लक उरलीत असं म्हटलं. 

साप सांगत पत्नीचा मृतदेह अंगणात जाळला 
घरच्या मागे पत्नीचा मृतदेह जाळल्यानंतर पती राधूने तिची हाडे जमिनीत पुरली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दयाची हाडे जप्त केली. दिवसाढवळ्या पती राधूने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह जाळला होता हे ऐकून शेजारच्यांनाही धक्का बसला. साप जाळतोय सांगत त्याने पत्नीचा मृतदेहच जाळला. अखेर पतीने हे कृत्य का केले असा प्रश्न सर्वांनाच पडला. 

जमीन विकण्यावरून झाला होता पती-पत्नीत वाद 
राधूने काही दिवसांपूर्वी जमीन विकली होती. या जमीन विक्रीवरून राधूची पत्नी दया नाराज झाली होती. ही जमीन विकू नये असं पत्नीला वाटायचे. यावरून पती-पत्नीत वाद व्हायचा. या वादातून पती राधूने पत्नीला बेदम मारले. रागाच्या भरात पतीने पत्नीने गळा दाबून खून केला. 

Web Title: A husband killed his wife and burnt her body in Dhar, Madhya Pradesh