समलैंगिक संबंधामुळे युवकाचा जीव गेला; पोलीस तपासात चौकीदारच खूनी निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 20:11 IST2022-11-19T20:10:50+5:302022-11-19T20:11:12+5:30

पोलिसांच्या चौकशीत चौकीदार उडवाउडवीची उत्तरे देत होता. तेव्हा पोलिसांना त्याच्यावर संशय आला

A homosexual relationship watchman killed a young man at madhya pradesh | समलैंगिक संबंधामुळे युवकाचा जीव गेला; पोलीस तपासात चौकीदारच खूनी निघाला

समलैंगिक संबंधामुळे युवकाचा जीव गेला; पोलीस तपासात चौकीदारच खूनी निघाला

इंदूर - शहरातील चिमन बाग येथील माध्यमिक शाळेजवळ शुक्रवारी सकाळी एका युवकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. या घटनेने परिसरात दहशत पसरली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात करत युवकाची ओळख पटवत गुन्हेगाराचा शोध घेतला. या युवकाची हत्या करणारा आरोपी हा तिथेच राहणारा चौकीदार निघाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी चिमन बाग परिसरात शाळेजवळील एका इमारतीत जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला. हा मृतदेह पुरुषाचा असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले तेव्हा पोलिसांनी आसपासच्या परिसरात लोकांची चौकशी केली. त्यात एक चौकीदारही होता असं अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश रघुवंशी यांनी म्हटलं.  

पोलिसांच्या चौकशीत चौकीदार उडवाउडवीची उत्तरे देत होता. तेव्हा पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा रक्ताने माखलेले कपडे सापडले. पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच चौकीदाराने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याचसोबत युवकाची हत्या का केली याचे कारण स्पष्ट केले. मृत युवकासोबत चौकीदाराचे समलैंगिक संबंध होते. गुरुवार-शुक्रवारी रात्री युवक संबंध बनवण्याचा हट्ट करू लागला. चौकीदाराने त्याला नकार दिला तेव्हा दोघांमध्ये वाद झाला होता. 

तेव्हा संतापलेल्या चौकीदाराने त्याच्या डोक्यात बेल्ट मारला. तेव्हा युवक खाली पडला. त्यानंतर एका मागोमाग एक युवकावर चौकीदाराने हल्ला केला. शरीरावर अनेक वार केले. जेव्हा तो मेला तेव्हा त्याचा मृतदेह फरफटत नेत खोलीतून बाहेर आणला आणि कचऱ्याच्या कंटेनरजवळ फेकला. त्यानंतर मृतदेहावर केरोसिन टाकत त्याला जाळून टाकलं अशी कबुली चौकीदाराने पोलिसांना दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: A homosexual relationship watchman killed a young man at madhya pradesh