घरातून स्कूटीची चावी, हेल्मेट, शाळेची बॅग घेऊन निघाली अन् पुन्हा परतलीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:43 IST2023-01-10T14:42:16+5:302023-01-10T14:43:02+5:30
या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. अवनीनं आत्महत्या का केली याचा शोध घेतला जात आहे.

घरातून स्कूटीची चावी, हेल्मेट, शाळेची बॅग घेऊन निघाली अन् पुन्हा परतलीच नाही
मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून जीव दिला आहे. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तिला उचलून हॉस्पिटलला नेले परंतु रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलीस या मुलीच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.
मुलीनं केलेल्या सुसाईडची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. मूळचे खरखोदा रहिवासी रोहित अग्रवाल गोल्डन टॉवरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहतात. रोहित प्रॉपर्टी डिलर आहे. त्यांची मुलगी अवनी अग्रवाल मेरठ पब्लिक स्कूलमध्ये १२ वीच्या वर्गात शिकते.
मिळालेल्या माहितीनुसार, अवनी सोमवारी सकाळी साडे ९ वाजता घरातून स्कूटीची चावी, हेल्मेट आणि स्कूल बॅग घेऊन निघाली. मात्र ती स्कूलला पोहचलीच नाही. ती थेट टॉवरच्या छतावर गेली आणि सव्वा दहाच्या सुमारास तिने वरून उडी घेतली. टेरेसवरून उडी मारल्यानंतर उपस्थित लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी अवनीला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. अवनीनं आत्महत्या का केली याचा शोध घेतला जात आहे. सुसाईड नोटही मिळाली नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळींची पोलीस चौकशी करत आहेत. कौटुंबिक वाद, अभ्यासासाठी दबाव किंवा अन्य काही अँगल आहे का हे पोलीस शोधत आहेत.