नागपुरात कपड्यांचे दुकान फोडले, ३.६७ लाख चोरले

By दयानंद पाईकराव | Updated: September 24, 2023 15:06 IST2023-09-24T15:05:54+5:302023-09-24T15:06:00+5:30

शुक्रवारी २२ सप्टेंबरला ते रात्री ८ वाजता दुकानाला कुलुप लावून घरी गेले.

A clothing shop was broken into in Nagpur, 3.67 lakh was stolen | नागपुरात कपड्यांचे दुकान फोडले, ३.६७ लाख चोरले

नागपुरात कपड्यांचे दुकान फोडले, ३.६७ लाख चोरले

नागपूर : कपड्यांचे दुकान फोडून आलमारी व टेबलच्या ड्रॉव्हरमधून ३ लाख ६७ हजार ५०० रुपये चोरून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध तहसिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विपुल व्रजलाल शहा (वय ६३, रा. ईतवारी निकालस मंदिराजवळ, केसरियानाथ सोसायटी) यांचे तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत नंगा पुतला चौक येथे होलसेल मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान आहे. 

शुक्रवारी २२ सप्टेंबरला ते रात्री ८ वाजता दुकानाला कुलुप लावून घरी गेले. २३ सप्टेंबरला सकाळी सहा वाजता त्यांना आपले दुकान फोडल्याचे समजले. अज्ञात आरोपीने त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने दुकानातील आलमारी व टेबलच्या ड्रॉव्हरमधून ३ लाख ६७ हजार ५०० रुपये चोरून नेले. शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
 

Web Title: A clothing shop was broken into in Nagpur, 3.67 lakh was stolen