बनावट दस्तवेजाद्वारे इसार पावती करून फसवणूक, बुलढाण्यामध्ये गुन्हा दाखल

By अनिल गवई | Published: October 4, 2023 07:14 PM2023-10-04T19:14:02+5:302023-10-04T19:14:17+5:30

आर्वी येथील दाम्पत्यांविरोधात खामगावात फसवणुकीचा गुन्हा

A case has been registered for fraud and cheating by receiving Isar through forged documents | बनावट दस्तवेजाद्वारे इसार पावती करून फसवणूक, बुलढाण्यामध्ये गुन्हा दाखल

बनावट दस्तवेजाद्वारे इसार पावती करून फसवणूक, बुलढाण्यामध्ये गुन्हा दाखल

googlenewsNext

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव, (जि. बुलढाणा): जजुना हद्दीतील एका भूखंडाच्या खरेदीसाठी  सौदा करून पावणेदाेन लाखांचा इसार घेण्यात आला. मात्र, भूखंडाची खरेदी करण्यास सबंिधतांकडून वेळोवेळी  टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय बळावल्याने आर्वी येथील दाम्पत्याविरोधात खामगाव शहर पोलीसांत तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलीसांनी दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत निलेश पथरसिंग ठाकूर ४७, रा. समन्वय नगर खामगाव, ह.मू. नवोदय वि मुलथान ता. बदनावर जि. धार राज्य मध्यप्रदेश यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की,  हर्षल बाबासाहेब पांडे ४८ वर्ष आणि  सौ अपूर्वा हर्षल पांडे ४३ रा. रा अमरावती रोड मोहन रेस्टारंटचे मागे आर्वी ता आर्वी जि.अमरावती यांच्याकडून ४ ऑक्टोबर २३ चे पूर्वी मौजे जनुना ता खामगाव येथील शेत सर्वे क्र ३१ मधील प्लाट क्र- ११ हा खरेदी करण्याकरीता १६ जून २०१५ रोजी  एक लाख ७५००० रूपयांचा इसार देण्यात आला. तर ३० जुलै २०१५ रोजी उर्वरीत दोन लाख ६२ हजार ५३५ रुपये देण्याचे ठरले. मात्र, आरोपींनी भूखंडाचा इसार घेतल्यानंतर वेळोवेळी खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच इसारापोटी घेतलेली पावणे दोन लाखांची रक्कमही परत केली नाही.

दरम्यान, आरोपींनी संबंधित भुखंडाचे खोटे दस्तवेज बनवून फसवणूक केल्याचा आरोप केला. त्याचवेळी विद्यमान न्यायालयात सीआरपीसी कलम २०२ प्रमाणे तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी हर्षल पांडे आणि सौ. अपूर्वा पांडे यांच्या िवरोधात भादंवि कलम ४२०, ४१७, ४६५४६७, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोउपनि निलेश लबडे करीत आहेत.

Web Title: A case has been registered for fraud and cheating by receiving Isar through forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.