इस्टेट एजंटला कार्यालयात घुसून मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

By नामदेव मोरे | Updated: September 29, 2022 19:38 IST2022-09-29T19:37:23+5:302022-09-29T19:38:40+5:30

कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

A case has been registered against four persons after the estate agent was beaten up by entering the office, after the video went viral | इस्टेट एजंटला कार्यालयात घुसून मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

इस्टेट एजंटला कार्यालयात घुसून मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: बोनकोडे येथे श्री बालाजी रिअर इस्टेट या कार्यालयात घुसून तरूणाला मारहाण करण्यात आली आहे. लाकडी व लोखंडी राॅडने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायर होत असून या प्रकरणी चार जणांविरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

बोनकोडे सेक्टर १२ ई येथे कासीम सलमानी यांचे श्री बालाजी रियलईस्टेट नावाचे कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दोन तरूण आले. त्यांनी कासीम यांना लाथा- बुक्यांनी मारहाण सुरु केली. कार्यालयातील फरशी पुसण्यासाठीचे लाकडी व लोखंडी रॉडनेही जबर मारहाण केली.

कार्यालयाच्या समोरील काचाही तोडून टाकल्या. मारहाणीमध्ये डाव्या हाताचे व मनगटाचे हाड तुटले आहे. या घटनेनंतर रुग्णालयात जात असताना या दोघांव्यतिरिक्त अजून दोघांनी वाटेत आडवून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तर पाहून घेऊ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. या प्रकरणी चार संशयीतांविरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: A case has been registered against four persons after the estate agent was beaten up by entering the office, after the video went viral