सोसायटीत ओळख अन् फ्लॅटमध्ये भेट झाली, मग...; 'पती, पत्नी और वो' चा अजब कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 19:38 IST2024-08-05T19:36:49+5:302024-08-05T19:38:15+5:30
मुंबईतील एका सोसायटीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद करत तपासाला सुरूवात केली आहे.

सोसायटीत ओळख अन् फ्लॅटमध्ये भेट झाली, मग...; 'पती, पत्नी और वो' चा अजब कारनामा
मुंबई - लग्नानंतरचं लफडं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते समोर येतं असं बोललं जातं. मुंबईत असाच एक प्रकार घडला आहे. जेव्हा पती, पत्नी आणि वो...ही कहाणी समोर आली तेव्हा पोलीसही हैराण झाले. प्रेयसीनं तिचा प्रियकर आणि त्याच्या पत्नीविरोधात अश्लिल फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
२०१७ मध्ये ४७ वर्षीय व्यक्ती पत्नी आणि २ मुलांसह मुंबईतील एका पॉश सोसायटीत राहायला गेला. एकेदिवशी त्याची नजर सोसायटीतच राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेवर पडली. हे दोघे भेटले, त्यानंतर हळूहळू बोलणं होऊ लागलं. सुरुवातीला मैत्री त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध तयार झाले. एकदा प्रियकराची पत्नी मुलांसह बाहेर फिरायला गेली होती तेव्हा पतीने प्रेयसीला घरी बोलावलं. त्यानंतर हे नेहमीच सुरू झाले. पत्नी, मुले बाहेर गेल्यावर पती प्रेयसीला घेऊन घरी यायचा.
एका कॉलनं बदलली पूर्ण कहाणी
पतीच्या घरी होणाऱ्या या गुपचूप भेटीचा सिलसिला सुरूच होता. रिपोर्टनुसार, १५ जुलै २०२४ रोजी महिलेला एक कॉल आला. हा फोन प्रियकराच्या पत्नीचा होता. तिने पती आणि तिच्या नात्याबाबत विचारले. तसेच तिला घरी बोलावले. ही बाब प्रेयसीला कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तिने घाबरून फोन ठेवून दिला. त्यानंतर लगेच प्रियकराला फोन केला मात्र तो घराबाहेर होता. घाबरलेल्या अवस्थेत महिला प्रियकराच्या घरी पोहचली आणि त्याच्या पत्नीशी बोलू लागली.
मोबाईलवर दाखवले अश्लील फोटो, व्हिडिओ
प्रियकराची पत्नी भडकली होती. तिने तिच्या मोबाईलमधील प्रेयसीचे अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवले त्यानंतर महिला अवाक् झाली. जेव्हा ती महिला प्रियकराच्या घरी एकटी यायची तेव्हाचे ते व्हिडिओ होते. तिने पत्नीला हे व्हिडिओ, फोटो डिलीट करण्याची विनंती केली. त्यानंतर प्रेयसी घरी परतली. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी सर्व फोटो, व्हिडिओ महिलेच्या नातेवाईकांना पाठवले. काही वेळाने हे सर्व फोटो व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले.
फोटो पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी
प्रेयसी खूप घाबरली होती, तिने बदनामीच्या भीतीनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नाही. मंगळवारी तिच्या एका नातेवाईकाच्या मोबाईलवर अज्ञात कॉल आला. फोन करणाऱ्याने हे फोटो, व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीत तिने प्रियकराने फसवणूक करून व्हिडिओ, फोटो काढले असा आरोप केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.