महिला डॉक्टरला धमकी दिल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा
By दिपक दुपारगुडे | Updated: March 14, 2023 15:01 IST2023-03-14T15:01:04+5:302023-03-14T15:01:39+5:30
याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना जानकर यांनी फिर्यादी दिली आहे

महिला डॉक्टरला धमकी दिल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा
सोलापूर : विनापरवाना ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन शासकीय कामात अडथळा आणून एका महिलाडॉक्टरला धमकी दिल्याप्रकरणी सोमनाथ माळी यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगराध्यक्षांच्या पतीवरच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना जानकर यांनी फिर्यादी दिली आहे. याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ९ मार्च रोजी सकाळी ११.२५ वाजण्याच्या सुमारास डॉ. जानकर या मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे पेंशट तपासून शासकीय कर्तव्य बजावत असताना सोमनाथ माळी याने विनापरवाना कोणतेही कारण नसताना येऊन फिर्यादी व आमचे नर्सिंग स्टाफला मोठमोठ्याने आरडाओरड करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केले. शासकीय कामात अडथळा करून त्यात व्यत्यय आणून फिर्यादीस शासकीय काम करू दिले नाही, म्हणून सोमनाथ माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.