ओढणी ओढल्याप्रकरणी इसमासह सात जणांवर गुन्हा!
By दिपक दुपारगुडे | Updated: July 7, 2023 16:01 IST2023-07-07T16:00:53+5:302023-07-07T16:01:16+5:30
पीडिता आणि आरोपींची जागेच्या बाबत कोर्टात केस सुरू आहे. त्या ठिकाणच्या घरावर आराेपी ताटपत्री घालण्याचे काम करत होते.

ओढणी ओढल्याप्रकरणी इसमासह सात जणांवर गुन्हा!
सोलापूर : महिलेच्या अंगावरील ओढणी ओढून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी इसमासह सात जणांवर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे.
पीडिता आणि आरोपींची जागेच्या बाबत कोर्टात केस सुरू आहे. त्या ठिकाणच्या घरावर आराेपी ताटपत्री घालण्याचे काम करत होते. त्यावेळी पीडितेने विरोध केल्यानंतर सादिक राजसाब पटेल याने पीडितेला शिवीगाळ करत तिची ओढणी ओढून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावेळी पीडितेच्या घरातील मंडळी आल्यानंतर आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे.
या फिर्यादीवरून सादिक राजसाब पटेल, हसीना राजसाब पटेल, सय्यद राजसाब पटेल, नजीर राजसाब, अफरिन सय्यद पटेल, महिबूब सैपनसाब शेख, सरफराज अकबर शेख ( रा. रामवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.