शरीरसुखाची मागणी नाकारली, विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार; युवकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:30 IST2025-02-09T08:30:17+5:302025-02-09T08:30:43+5:30

रोहित तिच्या घरी गेल्यानंतर तिने आरोपी रोहितला दारूची बॉटल आणण्यास सांगितले. दोघांनी सोबत दारू घेतली.

A boy murdered a married woman in Nagpur, youth was angry after she refused his request for physical pleasure | शरीरसुखाची मागणी नाकारली, विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार; युवकाला अटक

शरीरसुखाची मागणी नाकारली, विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार; युवकाला अटक

नागपूर - हुडकेश्वराच्या आनंदनगरातील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेच्या मारेकऱ्याला हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे. तपासात आरोपीने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. तिचे कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेला कपडे घालून फरार झाल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले.

मृतदेहावर बलात्कार रोहित गणेश टेकाम (वय २५, रा.  पारशिवनी) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिसांनी शनिवारी दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.हुडकेश्वर खुर्दमधील आनंदनगरात ३३ वर्षीय महिला पती व १० वर्षाच्या मुलीसह राहत होती. गुरुवारी ६ फेब्रुवारीला सकाळी महिलेचा पती हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी गेला तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळी ११.३० वाजता या महिलेला तिच्या ओळखीचा युवक आरोपी रोहितचा कॉल आला. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले. रोहित तिच्या घरी गेल्यानंतर तिने आरोपी रोहितला दारूची बॉटल आणण्यास सांगितले. दोघांनी सोबत दारू घेतली. त्यानंतर आरोपी रोहितने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्याला विरोध केल्यामुळे आरोपी रोहितने तिला धक्का देऊन खाली पाडले.

महिलेच्या कानातून रक्त येत असल्यामुळे तिने आरडाओरड सुरु केली. त्यामुळे घाबरून आरोपी रोहित तेथून पळून गेला.परंतु, काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी रोहितला आपला मोबाईल महिलेच्या घरात विसरल्याचे समजल्यामुळे तो पुन्हा महिलेच्या घरी गेला. रोहित पुन्हा आल्याचे पाहून महिलेने पुन्हा आरडाओरड सुरु केली. त्यामुळे आरोपी रोहितने ओढणीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी रोहितच्या मनातील राक्षस जागा झाला. त्याने महिलेचे कपडे काढून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिलेला कपडे घातले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

शवविच्छेदनातही उघड

शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता आरोपी रोहित महिलेच्या घरी आल्याचे त्यांना समजले. लगेच आरोपीला अटक करून त्याची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सोबत करायचे पेंटिंगचे काम

आरोपी रोहित आणि मृत महिला २ वर्षापासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही पारडी परिसरात पेंटिंगचे काम करायचे. ओळख झाल्यामुळे त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिले होते. 

Web Title: A boy murdered a married woman in Nagpur, youth was angry after she refused his request for physical pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.