घरात दारुची बॉटल ठेवलेली, पत्नीने पिऊन टाकली, पती जेव्हा घ्यायला गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 08:33 IST2023-03-15T08:33:17+5:302023-03-15T08:33:46+5:30

होळीच्या दिवशी त्याने दारु आणून ठेवली होती. ती ललिता ने संपविली होती.

A bottle of liquor kept in the house, the wife drank it, when the husband went to get it... | घरात दारुची बॉटल ठेवलेली, पत्नीने पिऊन टाकली, पती जेव्हा घ्यायला गेला...

घरात दारुची बॉटल ठेवलेली, पत्नीने पिऊन टाकली, पती जेव्हा घ्यायला गेला...

छत्तीसगढच्या जशपूरमध्ये एका व्यक्तीने दारुपाई पत्नीची मारहाण करून हत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. तिने त्याची दारू पिऊन टाकली, या रागातून त्याने पत्नीची हत्या केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. 

ही घटना शांतीनगरची आहे. पत्नीने त्याची दारू पिली होती. यामुळे त्याला राग आला होता. यातून त्याने दांड्याने पत्नीला मारहाण केली. तिला जबर मार बसल्याचे दिसताच हॉस्पिटलला घेऊन गेला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

ललिता एक्का (४२) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या पतीचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. यामुळे तिने तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या बबलू राम (20) सोबत लग्न केले होते. तो मजुरी करत होता. तसेच त्याला दारुचे व्यसन होते. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचा. 

होळीच्या दिवशी त्याने दारु आणून ठेवली होती. ती ललिता ने संपविली होती. महिलेचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेच्या भाच्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

Web Title: A bottle of liquor kept in the house, the wife drank it, when the husband went to get it...