बहिणीच्या घरातून सोन्याच्या दागीन्यांची बॅग लंपास

By दयानंद पाईकराव | Updated: May 20, 2023 15:55 IST2023-05-20T15:54:56+5:302023-05-20T15:55:09+5:30

अज्ञात आरोपीने त्यांच्या बहिणीच्या घरातून हॉलमध्ये ठेवलेल्या बॅगमधून सोन्याचे दागीने किंमत ९६ हजार चोरून नेले.

A bag of gold jewelery was stolen from the sister's house | बहिणीच्या घरातून सोन्याच्या दागीन्यांची बॅग लंपास

बहिणीच्या घरातून सोन्याच्या दागीन्यांची बॅग लंपास

नागपूर : बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आलेल्या महिलेची सोन्याचे ९६ हजार रुपये किमतीचे दागीने असलेली बॅग पळविल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोसलिना रबेलसन मसी (वय ३८, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, दादर रोड, भिलाई जि. दुर्ग) या आपली चुलत बहिण अनिता राजेश बात्रे (रा. गोल्ड जीमजवळ, ख्रिश्चन कॉलनी, मेकोसाबाग) येथे मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये एका डब्यात सोन्याचे दागीने ठेऊन ती बॅग हॉलमध्ये ठेवली होती.

अज्ञात आरोपीने त्यांच्या बहिणीच्या घरातून हॉलमध्ये ठेवलेल्या बॅगमधून सोन्याचे दागीने किंमत ९६ हजार चोरून नेले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: A bag of gold jewelery was stolen from the sister's house