६० वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार; वाशिममधील धक्कादायक घटना

By संतोष वानखडे | Updated: September 25, 2022 15:29 IST2022-09-25T15:29:07+5:302022-09-25T15:29:35+5:30

प्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून २५ सप्टेंबर रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला.

A 60-year-old man molested a dynamic young woman; Shocking incident in Washim | ६० वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार; वाशिममधील धक्कादायक घटना

६० वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार; वाशिममधील धक्कादायक घटना

वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम लावना येथे एका ६० वर्षाच्या वृद्धाने २५ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून २५ सप्टेंबर रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लावणा येथील एका ५० वर्षीय फिर्यादी महिलेने तक्रार दिली की, फिर्यादीच्या २५ वर्षीय गतिमंद मुलीवर गावातीलच आरोपी रमजान परसुवाले (६०) याने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरात कोणी नसताना अतिप्रसंग केला. या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी भादंवि कलम ३७६ तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे व चमूने अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास एसडीपीओ पांडे करीत आहेत.

Web Title: A 60-year-old man molested a dynamic young woman; Shocking incident in Washim