खाऊ देतो म्हणाले अन् घराचा दरवाजा बंद केला; त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 17:43 IST2022-02-20T17:42:52+5:302022-02-20T17:43:19+5:30
धुळे जिह्यातील धक्कादायक घटना

खाऊ देतो म्हणाले अन् घराचा दरवाजा बंद केला; त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला!
धुळे- देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. 6 वर्षे चिमुकलीवर 56 वर्षे नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने घराचा दरवाजा बंद करून 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत घडला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी बळवंत निकम याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.
सदर चिमुकली एकटी असल्याचे बघून, त्यांच्या इथे भाडेकरू असलेल्या संशयित नराधम बळवंत निकम याने घरात बोलून, खाऊ देतो असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. सदर घडलेला प्रकार चिमुकली आपल्या आजीला सांगितल्यानंतर आजीने देवपूर पोलिस स्टेशन ला तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली.