सोलापूरात ३० वर्षीय कापड व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल; फेब्रुवारीत होणार होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:00 IST2025-09-30T11:59:47+5:302025-09-30T12:00:21+5:30
रेडिमेड कापड कारखान्यातच मालकाने घेतला गळफास, जीवन संपवल्याचे कारण अस्पष्ट

सोलापूरात ३० वर्षीय कापड व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल; फेब्रुवारीत होणार होतं लग्न
सोलापूर - बीडी घरकुल परिसरातील एका रेडिमेड कापड कारखान्यात ३० वर्षीय मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लोकेश अनिल बिर्रू (रा. आय ग्रुप, जुने बीडी घरकुल) असे त्या तरुण मालकाचे नाव आहे. लोकेशचा साखरपुडा झाला होता, त्याचा विवाह फेब्रुवारीमध्ये होणार होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
लोकेश यांनी राहत्या घरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या कापड कारखान्यात पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना कळाल्यानंतर त्यांना लगेच खात्री उतरवून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लोकेश अनिल बिर्रू यांनी आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. लोकेश यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळी कामगार आले होते...
घटनेची माहिती कळताच मित्रमंडळींनी एकत्र गर्दी केली होती. यावेळी आई आणि त्यांच्या जुळा भाऊ रडताना पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. त्यांच्या कारखान्यात एक कामगार सकाळी कामासाठी आला. त्याला काम देऊन आतील बाजूस जाऊन त्यांनी गळफास घेतला. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.