शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

19 वर्षीय मुलीनं 15 वर्षाच्या मुलावर केला होता बलात्कार! इंदूर कोर्टनं सुनावली मोठी शिक्षा, ऐकूण थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 19:16 IST

आरोपी तरुणीने फसवणूक करत अल्पवयीन तरुणाला गुजरातला नेले होते आणि तेथे त्याच्यासोबत अनेक वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

आपण आतापर्यंत एखाद्या तरुणाने मुलीवर बलात्कर केल्याच्या घटना ऐकल्या अथवा वाचल्या असतील. मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर न्यायालयाने पहिल्यांदाच एका तरुणीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी तरुणीने फसवणूक करत अल्पवयीन तरुणाला गुजरातला नेले होते आणि तेथे त्याच्यासोबत अनेक वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर 2018 रोजी एका महिलेने इंदूरमधील बाणगंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधित महिलेचा 15 वर्षांचा मुलगा 3 नोव्हेंबर 2018 रोजी जवळच्याच दुकानावर दूध आणण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. संबंधित महिलेने आपल्या मुलाचा जवळपासच्या नातलगांकडेही शोध घेतला. मात्र त्याचा तपास लागला नाही. यानंतर संबंधित महिलेने, आपल्या मुलाचे फूस लावून अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करत, त्याला शोधण्यासाठी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर, पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेतला. तेव्हा त्याच्यासोबत एक तरुणीही पकडली गेली होती. 

मुलाचा फोनही स्वतःकडेच ठेवायची तरुणी - पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, राजस्थानमधील एका 19 वर्षीय तरुणीने फसवणूक करून त्याला गुजरातमध्ये नेले. या ठिकाणी तिने त्याला टाइल्स बनविण्याच्या कारखान्यात कामाला लावले. पीडित मुलाने सांगितले की, संबंधित तरुणी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याला भाग पाडत होती. महत्वाचे म्हणजे, मुलाला आपल्या घरच्यांसोबत संपर्क साधता येऊ नये म्हणून, तिने मुलाचा मोबाईल फोनही आपल्याजवळच ठेवला होता.

पीडित मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी मुलीला अटक करत तिच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता मुलीवरील आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात, जिल्हा अभियोग अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, संबंधित आरोपी तरुणीने अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून गुजरातला नेले आणि एका कंपनीत कामाला लावले. मुलगी त्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहायची आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायची. जिल्हा अभियोक्ता अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉक्सो कायद्यांतर्गत मुलीला शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.

न्यायालयाने सुनावली अशी शिक्षा -न्यायालयाने 15 मार्च रोजी याप्रकरणी निकाल देताना दोषी मुलीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यासोबतच पीडित तरुणीला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिफारसही न्यायालयाने सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगCourtन्यायालय