१० वीच्या मुलीनं दिला बाळाला जन्म; शाळेने वडिलांना कळवलं, ते म्हणाले, हे घडलं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:36 IST2025-02-25T13:35:38+5:302025-02-25T13:36:27+5:30
ही घटना जानेवारी २०१९ ला घडली होती, तेव्हा ही विद्यार्थिनी ८ वीत शिकत होती. विशेष म्हणजे मुली गर्भवती होण्याच्या प्रकाराने पालकांची चिंता वाढली आहे.

१० वीच्या मुलीनं दिला बाळाला जन्म; शाळेने वडिलांना कळवलं, ते म्हणाले, हे घडलं कसं?
ओडिशामध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी हॉस्टेलमध्ये राहणारी १० वीची विद्यार्थिनी आई बनली आहे. ही विद्यार्थी ९ महिन्यापासून गर्भवती असतानाही कुणालाही काही कळलं कसं नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या प्रशासनाला ही बाब निदर्शनासही आली नाही. हाच प्रश्न मुलीच्या वडिलांना पडला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असून खरे काय ते शोधले जात आहे.
मल्कानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा परिसरात बनलेल्या सरकारी निवासी शाळेतील हा प्रकार आहे. इथं दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. राज्य सरकारच्या अनुसूचित जाती, जमाती विभागाकडून ही शाळा चालवण्यात येते. परीक्षा देऊन परतल्यानंतर काही तासांत ही घटना घडली. विशेष म्हणजे अनेक महिने ही गर्भवती असूनही ती क्लास आणि परीक्षेला हजर राहत होती.
याबाबत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मी जेव्हा शाळेत पोहचलो, तेव्हा माझ्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे तसं कळवण्यात आले. माझी मुलगी हॉस्टेलला राहतो, बराच काळ ती घरी आली नाही. एक नर्स नियमितपणे हॉस्टेलमधील मुलींचे चेकअप करत असते. एखादी मुलगी गर्भवती आहे ते तिला कळाले कसे नाही, शाळेतील शिक्षकांनी या प्रकारासाठी हॉस्टेलच्या वार्डनला जबाबदार धरलं आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, धेनकनाल जिल्ह्यात एका आश्रम शाळेत १३ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनी ७ महिन्याची गर्भवती आढळली होती. त्यानंतर तिच्यावर शाळेतील हेडमास्टरने कार्तिक गौरवर बलात्काराचे आरोप लावले होते. ही घटना जानेवारी २०१९ ला घडली होती, तेव्हा ही विद्यार्थिनी ८ वीत शिकत होती. विशेष म्हणजे मुली गर्भवती होण्याच्या प्रकाराने पालकांची चिंता वाढली आहे. राज्य सरकारने आदिवासी हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुली गर्भवती होण्यापासून रोखण्यासाठी ३ हजार मेट्रन आणि ३३६ एएनएम तैनात केले होते त्याशिवाय नियमित मुलींचे चेकअप केले जाते. महिला हॉस्टेलमध्ये कुठल्याही पुरूषाला प्रवेश दिला जाऊ नये यासाठी नियम कठोर केले आहेत.