शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या संचालकांकडून महिलांची ९१ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 16:47 IST

ठेवी म्हणून जमा झालेल्या रक्कमेची मुदतपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी ठरल्याप्रमाणे मुद्दल, व्याज, लाभांश व फायदा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना परत केली नाही़.

पुणे : महिला बचत गटाची स्थापना करुन त्यांना शिवजीत मुद्रा क्रेडिट सोसायटीचे शेअर महिलांना घेण्यास भाग पाडून त्याची मुदत संपल्यानंतरही लाभांश, व्याज न देता महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाच्या संचालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़. चंदननगर पोलिसांकडे आतापर्यंत ९१ लाख ५१ जार ५४६ रुपयांच्या तक्रारी आल्या आहेत़. श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे संस्थापक शिवाजी तुकाराम ढमढेरे, सविता विजय थोरात, विजय थोरात, अंजली थोरात (सर्व रा़. ममता सोसायटी एरिया, ज्युपिटर कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी) इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी मिना मोहन इंगळे (वय ४४, रा़. माळवाडी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार १० डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत वडगाव शेरी येथे घडला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवाजी ढमढेरे हे श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे संस्थापक आहेत़. त्यांनी व थोरात आणि शिवजीत मुद्रा मल्टीस्टे क्रेडिट को -ऑप सोसायटीचे संचालक मंडळ यांनी श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघाद्वारे महिला बचत गट सुरु केला़ महिलांना त्यांनी बचत गटाद्वारे जमा झालेली रक्कम ठेवी म्हणून सोसायटीत ठेवायला सांगितली़. महासंघाद्वारे सुरु केलेल्या विविध उपक्रमांसाठी पैसे जमा करुन घेतले़.शिवजीत मुद्रा क्रेडिट सोसायटी बँकेचे ११ हजार रुपयांचे शेअर महिलांना खरेदी करायला सांगितले़. त्यांनी खरेदी केल्यानंतर ठेवी म्हणून जमा झालेल्या रक्कमेची मुदतपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी ठरल्याप्रमाणे मुद्दल, व्याज, लाभांश व फायदा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना परत केली नाही़. तसेच बचत गट सुरु केल्यानंतर त्याद्वारे कोणाला काही एक वस्तू अगर काम न देता महिलांची फसवणूक केली़. या महिलांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे़. मिना इंगळे यांची ११ हजार रुपयांची व इतर महिलांची असे मिळून आतापर्यंत ९१ लाख ५१ हजार ५४६ रुपयांच्या तक्रारी आल्या असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़. पोलीस उपनिरीक्षक पी़ व्ही़ कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी