शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ९० हजार उकळणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:39 IST

आरोपीने तरुणीला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी केली.

पिंपरी : इव्हेंटमध्ये काम देण्याचे आमिष दाखवत तरुणीचे फोटो मागवून घेतले. त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीकडून ९० हजार रुपये उकळले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेंद्र सिंह मॅथॉन (वय २३, रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही २३ वर्षांची असून खासगी कंपनीत नोकरी करते. आरोपी विरेंद्र मॅथॉन याने फिर्यादी तरुणीशी तीन महिन्यांपूर्वी ओळख केली. तरुणीचा विश्वास संपादन करून तिला इव्हेंटमध्ये काम देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने तरुणीकडून तिचे फोटो मागून घेतले. तरुणीने आरोपीला फोटो दिले. त्यानंतर आरोपीने तरुणीला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीने तरुणीकडून रोख रक्कम तसेच तरुणीच्या एटीएमद्वारे ९० हजार रुपये जबरदस्तीने घतेले. त्यानंतर आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेजही पाठविले. भोसरी पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाWomenमहिला