शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:06 IST

Delhi Rape crime: दिल्लीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. एक लहान मुलगी सुटकेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. ती अर्धनग्न अवस्थेत होती.

Rape case news: नऊ वर्षांची मुलगी. ती बर्फ घेऊन आजीच्या घराकडे गेली होती. पण, बराच वेळ उलटला तरी घरी आलीच नाही. मग शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी कळलं की ती घरातून निघाली, पण आजीच्या घरी पोहोचलीच नाही. मग कळलं की, काही लहान मुलांनी तिला एका फ्लॅटमध्ये जाताना बघितलं. त्यानंतर जे समोर आलं, ते धक्कादायक होतं. मुलगी एका सुटकेसमध्ये अर्धनग्न अवस्थेत आणि बेशुद्ध पडलेली होती.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही घटना घडली ती दिल्लीतील नेहरू विहार भागात. शनिवारी रात्री नऊ वर्षाची मुलगी एका फ्लॅटमधील सुटकेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला. 

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गेला जीव

पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील तिला रुग्णालयात घेऊन चालले होते. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिने प्राण सोडला. रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या आईवडिलांनी कॉलनीमध्ये राहणाऱ्या नौशाद नावाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. संशयित आरोपी घटना घडल्यापासून फरार आहे.

फ्लॅटमध्ये जाताना दिसली मुलगी

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या आजीच्या घरी बर्फ द्यायला गेली होती. पण ती तिकडे पोहोचलीच नाही. शोध घेत असताना काही लहान मुलांनी ती कॉलनीमधीलच एका फ्लॅटमध्ये जाताना दिसल्याचे सांगितले.

वाचा >>सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल 

जेव्हा मुलीचे आईवडील आणि नातेवाईक त्या फ्लॅटकडे गेले, तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. त्यामुळे त्यांनी कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला. 

सुटकेसमधून ठिपकत होते रक्त

घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना एक सुटकेस दिसली. त्यातून रक्त ठिपकत होते. त्यांनी ती सुटकेस उघडली, ज्यात नऊ वर्षाची मुलगी बेशुद्धावस्थेत पडलेली होती. ते लगेच तिला रुग्णालयात घेऊन निघाले, पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला असून, दिल्ली आणि दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांवर धाडीही टाकल्या. पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. 

ज्या फ्लॅटमध्ये सुटकेसमध्ये मुलगी आढळून आली, त्याच फ्लॅटमध्ये नौशाद राहतो. तो बिर्याणी विकतो. त्याची पत्नी माहेरी गेलेली आहे. त्यामुळे घरी तो एकटाच होता. दिल्ली पोलिसांचे सहा पथके सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी