वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पुन्हा सापडला ९ फुटी अजगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:26 IST2018-10-09T21:22:01+5:302018-10-09T21:26:27+5:30
सर्पमित्रांच्या सहाय्याने एका अजगराला पकडण्यात यश आले तर एक अजगर मिठी नदीत पळून गेला. परंतु, भल्या मोठ्या अजगरामुळे परिसरात मोठी खळबळ माजली.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पुन्हा सापडला ९ फुटी अजगर
मुंबई – मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ रविवारी रात्री तब्बल ९ फूट लांबीचे दोन अजगर दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिठी नदीच्या पुलाजवळ रात्री नऊच्या सुमारास हे दोन अजगर आढळून आले. अजगर आढळून आल्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आले. सर्पमित्रांच्या सहाय्याने एका अजगराला पकडण्यात यश आले तर एक अजगर मिठी नदीत पळून गेला. परंतु भल्या मोठ्या अजगरामुळे परिसरात मोठी खळबळ माजली.
Mumbai: Police rescued a python from near Bandra Kurla Complex last night pic.twitter.com/5xExbiYu2L
— ANI (@ANI) October 9, 2018