उघड्या घरातून ८० हजाराची रोकड लंपास
By सागर दुबे | Updated: April 21, 2023 15:39 IST2023-04-21T15:39:03+5:302023-04-21T15:39:18+5:30
निवृत्ती पाटील (८०) हे जगवानी नगरामध्ये वास्तव्यास असून ४ ते ८ एप्रिलच्या दरम्यानात त्यांच्या घरामधून ८० हजार रूपये चोरट्याने चोरून नेले आहे.

उघड्या घरातून ८० हजाराची रोकड लंपास
जळगाव : जगवानी नगर येथील निवृत्ती नथ्थु पाटील यांच्या उघड्या घरातून ८० हजार रूपयांची रोकड चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
निवृत्ती पाटील (८०) हे जगवानी नगरामध्ये वास्तव्यास असून ४ ते ८ एप्रिलच्या दरम्यानात त्यांच्या घरामधून ८० हजार रूपये चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत गुरूवारी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राजपूत करीत असून पाटील यांनी त्यांची नातेवाईक महिलेने पैसे लांबविले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.