अमरावतीत ८० किलो गांजा जप्त; अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धडक कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: February 7, 2026 14:44 IST2026-02-07T14:44:00+5:302026-02-07T14:44:34+5:30

ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

80 kg of ganja seized in amravati anti Narcotics task Force take action | अमरावतीत ८० किलो गांजा जप्त; अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धडक कारवाई

अमरावतीत ८० किलो गांजा जप्त; अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धडक कारवाई

प्रदीप भाकरे, ​अमरावती:  येथील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) शुक्रवारी उशिरा रात्री मोठी कारवाई करत ८० किलो गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ आणि वाहनांसह एकूण २१ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा मार्डी रोडवरील अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलजवळ एका निळ्या रंगाच्या कारमधून गांजाची विक्री होणार होती. पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, बाळू बन्सी पवार (३९, रा. मोगरा) याला अटक करण्यात आली, तर त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
​आरोपीकडून ​गांजा: ८०.१०० किलो (किंमत १६.०२ लाख रुपये), एक कार आणि एक यामाहा मोटारसायकल व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
​सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजित टिके आणि पोलीस उपअधीक्षक गजानन विखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title : अमरावती: 80 किलो गांजा जब्त; एंटी-नारकोटिक्स टास्क फोर्स की कार्रवाई

Web Summary : अमरावती एएनटीएफ ने 80 किलो गांजा जब्त कर एक को गिरफ्तार किया। अच्युत अस्पताल के पास हुई कार्रवाई में ₹21.12 लाख के ड्रग्स और वाहन जब्त किए गए। पुलिस आगे ड्रग तस्करी नेटवर्क की जांच कर रही है।

Web Title : Amravati: 80 kg Ganja Seized; Anti-Narcotics Task Force Action

Web Summary : Amravati ANTF seized 80 kg of ganja, arresting one. The operation, near Achyut Hospital, resulted in seizing ₹21.12 lakh worth of drugs and vehicles. Police are investigating further connections to the drug trafficking network.