कुलाबा विधानसभा मतदारसंघात 78 लाख 65 हजारांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 22:04 IST2019-10-18T22:01:18+5:302019-10-18T22:04:40+5:30
निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे एकूण 78 लाख 65 हजार रुपये संशयीत रक्कम पकडली.

कुलाबा विधानसभा मतदारसंघात 78 लाख 65 हजारांची रोकड जप्त
मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात 187-कुलाबा विधारनसभा या भागात काल सायंकाळी निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे एकूण 78 लाख 65 हजार रुपये संशयीत रक्कम पकडली. यात झवेरी बाजार येथे 9 लाख 45 हजार 400 रूपये, ग्रॅट रोड येथे 50 लाख रूपये आणि जेल रोड, नुर मंझिल येथे 19 लाख 20 हजार इतकी रक्कम संशयीत आढळून आली.
कुलाबा विधानसभा मतदारसंघात यज्ञेश ज्वेलर, 19/21 ताही बिल्डींग, 3 री अग्यारी लेन, झवेरी बाजार येथे महेश मिठालाल त्रिपाठी यांच्या कार्यालयात 9 लाख 45 हजार 400 रूपये तर क्राउन बिल्डींग, तिसरा माळा येथे मिहीर जिंतीलाल मेहता यांच्याकडे 50 लाख रूपये आणि जेल रोड, नूर मंझील चौथा माळा रूम नं. 410 येथे परवेझ नवाब शहा यांच्याकडे 19 लाख 20 हजार इतकी संशयीत रक्कम निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाने काल सायंकाळी पकडली. वरील सदर रक्कम लोकमान्य टिळक मार्ग, पोलीस ठाणे येथे जमा केली. मुंबई आयकर विभागाचे सहाय्यक संचालक यांना पुढील कार्यवाहीस्तव कळविण्यात आले आहे, अशी माहिती 187-कुलाबा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस समेळ यांनी दिली