Rajasthan Crime: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका वृद्ध महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फक्त सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका नराधमाने ७५ वर्षीय वृद्धेचे तुकडे करून ते पोत्यात भरून निर्जन स्थळी फेकून दिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पालडी कलान गावातील रहिवासी असलेल्या नथी देवी बावरी (७५) या १६ मार्च रोजी सकाळी गुरांसाठी चारा आणायला घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या अंगावर सुमारे ७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र, संध्याकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी रात्रभर शेतात आणि परिसरात शोध घेतला, पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.
पोत्यात आढळला छिन्नविच्छिन्न मृतदेह
१७ मार्च रोजी पाचरांडा गावाजवळील झुडपात गावकऱ्यांना एक प्लास्टिकचे पोते दिसले. ते उघडले असता त्यात एका वृद्ध महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला. नराधम आरोपीने ओळख पटू नये म्हणून महिलेचे डोकं आणि पाय धडावेगळे केले होते. अंगावरील सर्व दागिने गायब होते. मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या पोत्यांत भरून निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आले होते.
पोलिसांचा तांत्रिक तपास आणि आरोपीला बेड्या
नागौरचे पोलीस अधीक्षक रोशन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने तपास सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. घटनास्थळाजवळ सापडलेल्या एका चपलेने पोलिसांना संशयितापर्यंत पोहोचवले. तसेच गावातीलच एका घरात रक्ताचे डाग आढळले, जिथे फॉरेन्सिक टीमने हत्येची पुष्टी केली. पोलिसांनी परिसरातील ३०० हून अधिक मोबाईल क्रमांकांचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे २० मार्च रोजी पोलिसांनी पीडितेचा शेजारी मुकेश भारती (३८) याला अटक केली.
हत्येचा थरार अन् कारमधून मृतदेहाची विल्हेवाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथी देवी या चाऱ्यासाठी मुकेशच्या घरी गेल्या होत्या. तिथे त्याने लोखंडी रॉड किंवा कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून तीन पोत्यांत भरले आणि कारमधून नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले हत्यार आणि चोरी केलेले दागिने जप्त केले आहेत.
लूट की जमिनीचा वाद?
प्राथमिक तपासात दागिन्यांची लूट हाच मुख्य उद्देश दिसत असला, तरी ३० गुंठे जमिनीचा वादही यामागे असल्याची चर्चा आहे. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कुटुंबीयांचे आंदोलन आणि अंत्यसंस्कार
नथी देवींचे कुटुंब मजुरीवर अवलंबून आहे. आईच्या अशा भीषण अंतुमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जोपर्यंत शरीराचे सर्व अवयव सापडत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत कुटुंबीयांनी आंदोलन केले होते. अखेर उर्वरित अवशेष सापडल्यानंतर डेगाना येथे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्यानंतर अंत्यविधी पार पडले.
Web Summary : In Rajasthan, a 75-year-old woman was brutally murdered for her jewelry. The accused dismembered her body and disposed of the parts in sacks. Police arrested the neighbor, recovering the weapon and stolen jewelry. Land dispute suspected.
Web Summary : राजस्थान में एक 75 वर्षीय महिला की गहनों के लिए बेरहमी से हत्या कर दी गई। आरोपी ने उसके शरीर के टुकड़े कर बोरे में भरकर ठिकाने लगा दिए। पुलिस ने पड़ोसी को गिरफ्तार कर हथियार और चोरी किए गए गहने बरामद किए। भूमि विवाद का संदेह।