पोलिसांवरील गोळीबार प्रकरणी आणखी ७ आफ्रिकनना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:46 AM2018-12-25T06:46:21+5:302018-12-25T06:46:40+5:30

भायखळा येथे पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनवेळी गोळीबार केल्याप्रकरणी आणखी सातजणांना सोमवारी अटक करण्यात आली.

7 more Africans arrested in police firing case | पोलिसांवरील गोळीबार प्रकरणी आणखी ७ आफ्रिकनना अटक

पोलिसांवरील गोळीबार प्रकरणी आणखी ७ आफ्रिकनना अटक

Next

मुंबई : भायखळा येथे पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनवेळी गोळीबार केल्याप्रकरणी आणखी सातजणांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कोकेन, एम.डी. पावडरस दहा जिवंत काडतुसे, सात पासपोर्ट, १५ मोबाईलसह चार लाखावरची रोकड जप्त केली आहे. १५ डिसेंबरला पहाटे ही घटना घडली होती. याप्रकरणी सातजणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
सोमवारी पोलिसांनी ओबिता इनोसन्ट इनामडी (२४,) ओझानडी लिजना इफानी (२३),इझे मायकेल चुकुवोमा (२८), ओबीना उगवेझी (२८),दिबा ओलीव्हर नकी (३८),चिडीबेरे मायकल ओकोली (२८),मायकल चुकुवोमा उचेजिम्बा (४५, सर्व रा. कृष्णा रेसिडन्सी मिरा रोड) अटक केली. सर्वांना २८ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून कोकेन, एम.डी. पावडरस दहा जिवंत काडतुसे, सात पासपोर्ट आदी साहित्य जप्त हस्तगत करण्यात आले.

Web Title: 7 more Africans arrested in police firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.