इन्स्टाग्रामच्या मैत्रीने लावला ७ लाखांचा चुना; चेंबुरमधील बेस्ट चालकाच्या पत्नीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 10:21 IST2022-11-27T10:21:03+5:302022-11-27T10:21:13+5:30
तक्रारदार महिची अमेरिकेचा रहिवासी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीशी मैत्री झाली.

इन्स्टाग्रामच्या मैत्रीने लावला ७ लाखांचा चुना; चेंबुरमधील बेस्ट चालकाच्या पत्नीची फसवणूक
मुंबई : चेंबूर परिसरात एका महिलेला इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री महागात पडली. तिला ७ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला गेला. सदर महिला ही एका बेस्ट बसचालकाची पत्नी असून या प्रकरणी तिने पोलिसात धाव घेतली.
तक्रारदार महिची अमेरिकेचा रहिवासी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. दरम्यान, काही दिवसांनी तक्रारदाराला फोन आला. कॉलर महिलेने ती कस्टममधून बोलत असून दिल्ली विमानतळावर एक पार्सल तक्रारदाराच्या नावाने आल्याचे व ते हवे असल्यास ७ लाख ३५ हजार प्रोसेस फी लागेल असे सांगितले.
घरदुरुस्तीचे पैसे दिले-
तक्रारदाराने घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेतले होते, जे तिने या भेटवस्तूच्या नादात फसवणूक करताना दिले, मात्र त्यानंतरदेखील तिला पैशांसाठी फोन येत होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पतीला सांगितले. तिच्या पतीने पोलिसात धाव घेत घेतली.