७ मुली अन् १३ तरुण...स्पा सेंटरवर पोलिसांची धाड टाकली अन् समोर जे दिसलं ते पाहून सर्वच चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 13:29 IST2022-09-17T13:28:39+5:302022-09-17T13:29:23+5:30
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पलासिया ठाणे क्षेत्रात क्राइम ब्रांचनं एका स्पा सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकून ७ मुली आणि १३ मुलांना अटक केली आहे.

७ मुली अन् १३ तरुण...स्पा सेंटरवर पोलिसांची धाड टाकली अन् समोर जे दिसलं ते पाहून सर्वच चक्रावले!
इंदूर-
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पलासिया ठाणे क्षेत्रात क्राइम ब्रांचनं एका स्पा सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकून ७ मुली आणि १३ मुलांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सेंटरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक काम केलं जात होते. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा स्पा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात दारू आणि आपत्तीजनक सामग्री मिळाली आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे.
शहरात याआधीही अनेकदा स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली होती. तरी अजूनही स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरूच आहेत. याची वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत. आज धाड टाकण्यात आलेलं स्पा सेंटर पलासिया ठाणे क्षेत्रात गीता भवन परिसरातील आहे. येथील बालाजी हाइट्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर धाड टाकून पोलिसांनी ७ मुली आणि १३ तरुणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक सामग्री जप्त करण्यात आली आहे. तसंच मद्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये बहुतांश इंदूरच्या आसपासच्या परिसरातील मुलींचा समावेश आहे. स्पाच्या संचालकानं बोलावलं की त्या या ठिकाणी पोहोचत होत्या. पोलिसांनी सध्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.