शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! 62 वर्षीय महिलेवर बलात्कार, केली बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी अंगावर घातली बाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 14:24 IST

Crime News : महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला जीवे मारण्यासाठी अंगावर बाईक देखील घातली आहे. यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. महिलेला उपचारासाठी ग्वाल्हेरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरवाई परिसरात एका 62 वर्षीय महिलेवर मिठाई विक्रेत्याने आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केला आहे. एका कार्यक्रमात कामासाठी तिला बोलावण्यात आले होते. त्यानंतर महिलेला जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिला जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. आपागंज येथील कल्लू उर्फ दिलीप नावाच्या मिठाई विक्रेत्याला एका कार्यक्रमात जेवण तयार करण्याचे काम मिळाले. त्यासाठी एका महिलेचीही गरज होती. त्याने पीडित महिलेला बोलावले. 

आरोपीने महिलेला गिरवाई टेकडीवर नेले. त्याच्यासोबत त्याचा साथीदारही होता. दोघांनी पीडितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने यासाठी विरोध केला. आरोपीने तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावरून बाईक नेली. यात तिच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच गिरवाई पोलीस घटनास्थळी पोहोचले. वृद्धेने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिला उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली. या घटनेतील दुसरा आरोपी फरार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! "इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावं लागेल"; पतीने दिली धमकी

 देशभरात महिलांवरील अत्याचाऱाच्या, बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. "इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावं लागेल" अशी धमकी एका नवविवाहितेला तिच्या पतीने आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. लग्नाला अवघा एक महिना झाल्यावर पतीने आपल्या पत्नीला घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

गुजरातच्या अहमदाबादमधील नवविवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत पतीने आपला मोठा भाऊ आणि वडिलांसोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र यासाठी नकार दिला असता त्याने घरातून बाहेर काढलं. जर तुला इथे आमच्यासोबत राहायचं असेल तर द्रौपदी बनून राहावं लागेल असं पतीने म्हटल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधल्या चांदखेडा परिसरात राहणाऱ्या महिलेचं महिन्याभरापूर्वीच मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं होतं. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश