६० लिटर हातभट्टी दारु नष्ट; वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा

By विजय.सैतवाल | Updated: December 17, 2023 22:22 IST2023-12-17T22:21:51+5:302023-12-17T22:22:02+5:30

गेंदालाल मिल परिसरात गावठी हातभट्टीची दारुविक्री होत असल्याची होती माहिती

60 liters of hand furnace liquor destroyed; Proceedings at different places, crime against three | ६० लिटर हातभट्टी दारु नष्ट; वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा

६० लिटर हातभट्टी दारु नष्ट; वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत शहर पोलिसांनी ६० लिटर गावठी हातभट्टीची दारु नष्ट करण्यात आली. ही कारवाई रविवार, १७ डिसेंबर रोजी शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ, गेंदालाल मिल परिसरात करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेंदालाल मिल परिसरात गावठी हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे पोहचले.  तेथे मंगला प्रकाश बाविस्कर (रा. गेंदालाल मिल परिसर) ही महिला अवैधरित्या दारु विक्री करत असल्याचे आढळून आली. तिच्याकडून एक हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी हातभट्टीची दारु नष्ट करण्यात आली.

दुसरी कारवाई शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली करण्यात आली. तेथे मुस्तफा सलीम खाटीक (२८, रा. गेंदालाल मिल परिसर) हा गावठी दारु विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी  दारु जप्त करून नष्ट करण्यात आली. गेंदालाल परिसरातच संजय गोविंदा सोनवणे (३५, रा. गेंदालाल मिल) हा गावठी दारु विक्री करत असताना आढळून आल्याने त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी दारु जप्त करुन नष्ट करण्यात आली. या प्रकरणी तिंघाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 60 liters of hand furnace liquor destroyed; Proceedings at different places, crime against three