शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

६ वर्षाच्या चिमुरडीने केला हत्येचा खुलासा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून घरात पुरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:42 IST

Woman with the help of lover kills husband bury his body in home : पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तसेच तिचा प्रियकर फरार आहे.

ठळक मुद्देशाहिदाने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या शरीराचे चार तुकडे करत त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पुरला आणि त्याचा मोबाईल आपल्यापाशी ठेवला.

मुंबई - दहिसर पूर्वेच्या रावळपाडा येथील खान कंपाउंडमध्ये एक थरारक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा खुलासा एका ६ वर्षाच्या चिमुरडीने केला आहे. तिच्या आईने मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. घटनेच्या ११ दिवसानंतर मुलीने दिलेल्या माहितीवरुन दहिसर पोलिसांनी तिच्या वडिलांचा मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातून खोदून बाहेर काढला. पतीच्या हत्येप्रकरणी प्रियकरासह पत्नीला अटक करण्यात आली आहे. आजूबाजूच्या लोकांची कुजबुज आणि घरात स्वयंपाक घरात लावलेल्या नव्या फारश्या यावरून पोलिसांना संशय आला आणि तेथून हत्येचा गुंता सुटला असल्याची माहिती दहिसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचे २०१२ साली शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वच्या रावळपाडा येथील खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर रेल्वे स्टेशननजीक असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याला सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलगा आहे. दरम्यान, शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही गोष्ट रईसला समजल्यानंतर त्याने या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर रईस आणि शाहिदा यांच्यात खटके उडू लागले, त्यामुळे पत्नी शाहिदाने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा भयानक कट रचला. रईस अचानक २१ मेपासून गायब झाला होता. 

अकरा दिवसाआधी शाहिदा आणि अमित नको त्या स्थितीत असताना अचानक रईस घरी आला. यावेळी दोघांनीही घरात असलेल्या चाकूने रईसचा वायरने गळा आवळून हत्या केली. याचदरम्यान सहा वर्षाची चिमुकली आपल्या अडीच वर्षाच्या मुलासोबत घरात आली. तेव्हा आईने तिला धमकी दिली, की कोणाला काही सांगितल्यास तिलादेखील वडिलांप्रमाणेच मारुन जमिनीत पुरून टाकेन. खान कंपाउंडमध्येच राहाणाऱ्या रईसच्या एका मित्राने तो बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली. दुसरीकडे शाहिदाने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या शरीराचे चार तुकडे करत त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पुरला आणि त्याचा मोबाईल आपल्यापाशी ठेवला.

गोंडामधून घरच्यांचा फोन आल्यानंतर शाहिदा सांगायची, रईस न सांगताच कुठेतरी निघून गेला आहे. शेवटी तीन दिवसांआधी गावाहून रईसचा भाऊ खान कंपाउंडमधील रईसच्या घरी पोहोचला. याचवेळी संधी मिळताच सहा वर्षाच्या मुलीनं आपल्या काकाला आईच्या विवाहबाह्य संबंधांबद्दलची सगळी माहिती दिली. यानंतर त्याने पोलिसांनी ही सगळी घटना सांगितली. अखेर पोलिसांनी स्वयंपाकघरात पुरलेला बाहेर काढला आहे. अशा प्रकारे सहा वर्षाच्या चिमुकलीने आपल्या वडिलांच्या हत्येचा कटाबाबत मोठा खुलासा केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू