कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटणारे ६ जण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:54 IST2018-08-27T20:54:27+5:302018-08-29T14:54:14+5:30
एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मागील आठवड्यात रविवारी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटणारे ६ जण गजाआड
कल्याण - एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मागील आठवड्यात रविवारी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सायमन पॅट्रिक मॅनवेल उर्फ पापा (वय - १९), समीर मुस्ताक खान उर्फ बाबु (वय - १९), तजमुल सलीम सय्यद उर्फ तैफ (वय-१९), भूषण सुधाकर धोदमल उर्फ मन्या (वय - १९), किशोर गणेश गिरी (वय - १९) आणि दीपक समाधान खरात (वय - १९) अशी या आरोपींची नावे आहेत. यापैकी काही आरोपी गुटखा विक्रेते आहेत. एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातून सुटली. कल्याण शहाडदरम्यान एक्स्प्रेसची गती धिमी झाली. याचवेळी काही दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमधील जनरल डब्यात घुसून प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल, दागदागिने आणि रोख रक्कम प्रवाशांकडून हिसकावली. कसारा येथे गाडी थांबताच दरोडेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. मात्र त्यातील एक जण पोलिसांच्या हाती लागला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर चार दिवसांत पोलिसांनी आणखी पाच दरोडेखोरांना इगतपुरी येथून अटक केली आहे. या दरोडेखोरांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. लो