6 people gang arrested for attacking passenger; Wadala railway police taken action | प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक; वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई
प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक; वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई

ठळक मुद्दे बिहार येथून आलेल्या तिघा भावांनी टिळक नगर येथून सीएसएमटी येथे जाणारी लोकल पकडली. पोलीस ठाण्यात अंगझडतीत आरोपींकडून चार हजार रोख रक्कम व चांदीची चैन मिळून आली.

मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील टिळक नगर ते कुर्ला स्थानका दरम्यान प्रवाशांना मारहाण व चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला वडाळा रेल्वेपोलिसांनीअटक केली आहे. बिहार येथून आलेल्या तिघा भावांनी टिळक नगर येथून सीएसएमटी येथे जाणारी लोकल पकडली. यावेळी या सहा जणांच्या टोळीने या भावांच्या खिशातील रोख रक्कम चोरली. यावेळी या चोरांना प्रतिकार करायला गेलेल्या या तिघा भावांना सहा जणांच्या टोळीने मारहाण केली तसेच धावत्या लोकल मधून खाली फेकण्याचा प्रयत्न केला.

रेहमुल अब्दुल रहेमान शेख (२२) हे शुक्रवारी आपल्या दोन भावांसह टिळक नगर रेल्वे स्थानकावर सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. रेल्वे सुरू होताच टिळक नगर ते कुर्ला स्थानका दरम्यान आरोपी जुमून मूर्तजा सलमानी (२१) याने रेहमुल यांच्या खिशातील पाकीट चोरले. ही बाब रेहमुल यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पाकीट का चोरले? असा जाब विचारला. यामुळे आरोपीने रेहमुल यांना मारहाण सुरू केली व छातीवर ब्लेडने वार केले. यावेळी रेहमुल यांच्या दोन भावांनी आरोपीला प्रतिकार करताच आरोपीच्या पाच साथीदारांनी दोन्ही भावांना मारहाण केली. यावेळी दोघा भावांपैकी एकाच्या गळ्यातील चांदीची चैन आरोपींनी चोरली तसेच एकला चालत्या लोकल मधून ढकलण्याचा प्रयत्न केला. लोकल कुर्ला स्थानकावर पोहोचताच तिघा भावांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी फलाटावर हजर असणाºया पोलिसांनी आरोपींना पकडले. पोलीस ठाण्यात अंगझडतीत आरोपींकडून चार हजार रोख रक्कम व चांदीची चैन मिळून आली. पकडलेल्या आरोपींपैकी ४ आरोपी हे अल्पवयीन आहेत. हे सर्व आरोपी गोवंडी येथे राहणारे आहेत़

Web Title: 6 people gang arrested for attacking passenger; Wadala railway police taken action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.