शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:07 IST

भांगरवाडी विभागात तीन सदनिकांमध्ये चोरी करत सुमारे 5 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

लोणावळा : जोरदार कोसळणार्‍या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी गुरुवारी रात्री ते शुक्रवार पहाटे दरम्यान भांगरवाडी विभागात तीन सदनिकांमध्ये चोरी करत सुमारे 5 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.    भांगरवाडी येथील साईनाथ कृपा अपार्टमेंटमध्ये गणेश दत्तात्रय विकारी यांच्या बंद सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडत चोरट्यांनी कपाटामध्ये ठेवलेल्या साडे बावीस तोळे सोन्यावर हात मारला. याचसोबत वलवण येथिल ग्रीन वॉली अपार्टमेंट मध्ये राहणारे के.एन.व्ही. त्रिमुर्टुल रामाकुमार यांच्या घराचे लॅच लॉक उचकटून 32 इंची टिव्ही व 25 हजार रुपये रोख तसेच दामोदर कॉलनी भांगरवाडी येथील सागर वसंत लोकरे यांच्या घराचे कुलुप व कडीकोयंडा तोडत सोन्य‍ाची कर्णफुले व रोख रक्कम चोरीला गेली आहे.      लोणावळा शहर पोलीसांची सर्वत्र गस्त सुरु असताना देखील ह्या सलग चोर्‍या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून शहर पोलिसांसमोर ह्या चोर्‍या उघड करण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. सिसिटिव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिर उपनिरीक्षक र‍ाधिका मुंडे तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी