भाईंदरमध्ये ६ लाखांची घरफोडी, सोन्या-चांदीचे दागिने चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:25 IST2023-08-19T16:23:25+5:302023-08-19T16:25:41+5:30
भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर असलेल्या इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज चोरण्यात आला.

भाईंदरमध्ये ६ लाखांची घरफोडी, सोन्या-चांदीचे दागिने चोरीला
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर असलेल्या इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज चोरण्यात आला. या भागात आणखी दोन ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न चोरटयांनी केले.
रेल्वे मार्गाच्या समांतर महापालिकेने तात्कालीन नगरसेवकांच्या सांगण्यावरून संपूर्ण गटारावर प्लॅस्टिकची शेड उभारली आहे. सदर शेड येथील काही इमारतींच्या अगदी लागून आहेत. इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रमेशकुमार जैन हे साकीनाका येथील दुकानात गेले तर पत्नी व मुलं देवदर्शनासाठी भिवंडी येथे गेले.
शुक्रवारी रात्री जैन हे घरी आले असता आतल्या बाजूने सेफ्टी चैन चे लॉक लावण्यात आल्याचे कळल्याने ते त्यांनी हाताने उघडले. आत जाऊन पहिले असता कपात उघडे व सर्व अस्ताव्यस्त पडलेले होते. सोन्याची नाणी , सोन्या - चांदीचे दागिने व रोख असा ५ लाख ९८ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. शनिवारी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक माणिक कथुरे तपास करत आहेत .