उल्हासनगरात मोटरसायकलच्या डिकीतून ६ लाख ६५ हजाराची रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:47 IST2022-06-03T13:46:35+5:302022-06-03T13:47:13+5:30
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

उल्हासनगरात मोटरसायकलच्या डिकीतून ६ लाख ६५ हजाराची रक्कम लंपास
सदानंद नाईक
उल्हासनगर : मोटरसायकलच्या डिकीत ठेवलेले ६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने डिकीतून चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर मधील व्यावसायिक रोशन गंधानी यांनी बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-४ येथील पंजाब नॅशनल बँकेतील सागर फूड्स प्रॉडक्ट खात्यातून ६ लाख ६५ हजार रुपये काढले. सोबत असलेला मित्र रवी मुलचंदानी यांच्या मोटरसायकलच्या डीकी मध्ये पैशे ठेवून विट्ठलवाडी येथील रिलायन्स इंडिस्ट्रीज मध्ये गेले. परत येताना मोटरसायकलच्या डिकीची चाबी कोणीतरी काढून नेल्याचे लक्षात आल्यावर, डुप्लिकेट चाबी बनविण्यासाठी नेहरू चौकात गेले. मोटरसायकल उभी करून छाबी घेऊन आल्यावर कोणीतरी काढून नेलेल्या ओरिजनल चाबीने डिकी उघडून ६ लाख ६५ हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.