दुधाच्या कॅनचे झाकन मारून लुटले ५० हजार रुपये

By नामदेव भोर | Updated: June 14, 2023 16:34 IST2023-06-14T16:34:22+5:302023-06-14T16:34:34+5:30

या घटनेत संशयितांनी डेअरीमालक दिलीप नरहरी तांबे यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.

50,000 rupees were stolen by breaking the lid of a milk can | दुधाच्या कॅनचे झाकन मारून लुटले ५० हजार रुपये

दुधाच्या कॅनचे झाकन मारून लुटले ५० हजार रुपये

नाशिक : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर भागातील एका डेअरीवर छोटा हत्ती वाहन चालकला मारहाण करीत शिवीगाळ व दमबाजी केल्यामुळे हस्तक्षेप करणाऱ्या डेअरीमालकाच्या डोक्यात दुधाचे कॅनचे झाकन मारून हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

या घटनेत संशयितांनी डेअरीमालक दिलीप नरहरी तांबे याच्या खिशातील ५० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनी येथील बस थांब्यासमोर सलेल्या डेअरीवर संशयित सौरभ यादव, सुजित व त्यांचा साथीदार यांनी दीलीप नरहरी तांबे यांच्या छोटा हत्ती चारचाकी वाहनावरील चालक अनिल बोडके याला मारहाण करून शिवीगाळ व दमबाजी केली. 

यावेळी तांबे संशयितांना विचारणा करण्यास गेले असताना संशयितांनी तांबे यांनाही दुधाच्या कॅनच्या झाकनाने मारून तांबे यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. या प्रकरणात तांबे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मारहाण व जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: 50,000 rupees were stolen by breaking the lid of a milk can