A 50-year-old man died after being kicked in the chest during an argument | दारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

दारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

ठळक मुद्देया वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने जगदीश भुरेवाल याने शेख हसन यांच्या छातीत लात मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जालना : एका ५० वर्षीय इसमाचा खून केल्याची घटना जालना शहरातील कालीकृर्ती परिसरात शनिवारी रात्री घडली. शेख युनूस शेख हसन (५० रा. कुंभेफळ जालना) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी संशयीत आरोपी जगदीश तुळशीराम भुरेवाल (५२ रा. कालीकृर्ती जालना) याला ताब्यात घेतले आहे.


शेख युनूस शेख हसन  व जगदीश भुरेवाल हे दोघे शहरातील अभय कोटेक्स येथे हमालीचे काम करतात. शनिवारी रात्री जगदीश भुरेवाल याची बायको माहेरी गेल्याने जगदीश भुरेवाल व शेख युनूस शेख हसन हे दोघे दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने जगदीश भुरेवाल याने शेख हसन यांच्या छातीत लात मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी जगदीश भुरेवाल हा टेंशनमध्ये घराबाहेर फिरत होता. त्याला काही लोकांनी काय झाल्याचे विचारले असता, त्याने सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोनि. संजय देशमुख, समाधान तेलंग्रे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शेवच्छिदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी जगदीश तुळशीराम भुरेवाल (५२ रा. कालीकृर्ती) यास ताब्यात घेतले असून, विचारपूस केली जात आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मयताचे  बहीण मो गोरेजानी हसन शेख (५८) यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोउपनि. भताने हे करीत आहेत.

वर्षभरात ३७ खून
जालना जिल्ह्यात वर्षभरात ३७ खून झाले आहे. त्यापैकी ३६ खूनाची प्रकरणे उघडकीस आले आहेत. तर तब्बल ९३ जणांनी खूनाचा प्रयत्न केला आहे.  गतवर्षात मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच रविवारी दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: A 50-year-old man died after being kicked in the chest during an argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.