लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांतिनगर पोलिसांनी आरोग्यास हानीकारक असलेल्या एका बनावट पिस्ता कारखान्यावर सोमवारी सायंकाळी छापा घातला. तेथून ४९३ किलो बनावट पिस्ता जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नरेंद्र संभाजी पराते (वय ३५) याला अटक केली आहे.तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात राहणारा आरोपी नरेंद्र पराते याने शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा रामसुमेर नगरात बनावट पिस्ता कारखाना सुरू केला होता. काशी सेंगदाना चिप्स नावाने तो शेंगदाण्यात आरोग्याला हानीकारक असलेले रसायन मिसळवून त्याची कटिंग करायचा आणि पिस्त्यासारखा दिसणारा हा पदार्थ बाजारात दामदुप्पट भावाने विकायचा. त्याची माहिती कळताच शांतिनगर पोलिसांनी त्याच्या कारखान्यावर सोमवारी सायंकाळी छापा मारला आणि तेथून ४९३ किलो बनावट पिस्ता (ओलसर हिरवा शेंगदाणा) जप्त केला. माहिती अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या कारवाईची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनगरचे ठाणेदार के. बी. उईके, पीएसआय एस. एन. बनसोडे, हवलदार गणेश आनंद, नायक अश्विन, वसिम आणि विवेक यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात ४९३ किलो बनावट पिस्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:02 IST
शांतिनगर पोलिसांनी आरोग्यास हानीकारक असलेल्या एका बनावट पिस्ता कारखान्यावर सोमवारी सायंकाळी छापा घातला. तेथून ४९३ किलो बनावट पिस्ता जप्त करण्यात आला.
नागपुरात ४९३ किलो बनावट पिस्ता जप्त
ठळक मुद्देनागरिकांच्या आरोग्याशी खेळ : आरोपी गजाआड, शांतिनगर पोलिसांची कारवाई