मिनिटात हरवलेली ४४ हजाराची पर्स २० मिनिटात परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 22:11 IST2019-02-05T22:10:28+5:302019-02-05T22:11:40+5:30

अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांची शिताफी

44 thousand rupees lost in a minute in 20 minutes back | मिनिटात हरवलेली ४४ हजाराची पर्स २० मिनिटात परत

मिनिटात हरवलेली ४४ हजाराची पर्स २० मिनिटात परत

ठळक मुद्दे हरविलेली ४४ हजाराची रोकड असलेली पर्सचा अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे अवघ्या २० मिनिटात शोध लागला. पोलीस कॉन्स्टेबल दंगेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल महिलेने धन्यवाद देत आभार मानले.अ‍ॅण्टॉप हिल परिसरात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. परिसरातील एका वडा पावच्या स्टॉलवर निशा नावाची महिला आपल्या मुलासमवेत वडापाव खात होती.

मुंबई  - एका मध्यमवर्गीय महिलेची वडा पावच्या स्टॉलवर हरविलेली ४४ हजाराची रोकड असलेली पर्सचा अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे अवघ्या २० मिनिटात शोध लागला. पोलीस कॉन्स्टेबल दंगेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल महिलेने धन्यवाद देत आभार मानले.
अ‍ॅण्टॉप हिल परिसरात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. परिसरातील एका वडा पावच्या स्टॉलवर निशा नावाची महिला आपल्या मुलासमवेत वडापाव खात होती. त्यावेळी निशाने कामासाठी बॅँकेतून काढून आणलेले ४४ हजार असलेली पर्स बाजूला ठेवली होती.वडापाव खाल्यानंतर मोबाईलवर फोन आल्याने ती बोलत काही अंतर पुढे गेली. थोड्यावेळानंतर तिला पर्स स्टॉलवरच विसरल्याचे लक्षात आले. परत येवून पाहिली असता त्याठिकाणी न मिळाल्याने विचारणा केल्यावर माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेली महिला मुलासमवेत अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात जावून हा प्रकार सांगितला. ड्युटी अधिकारी वाणी यांनी तात्काळ कॉन्स्टेबल दंगेकर यांना त्याठिकाणी पाठविले. त्यांनी स्टॉल व परिसरातील व्यक्तीकडे खाक्या दाखवून विचारणा केल्यानंतर त्यांना ती मिळून आली. दंगेकर यांनी पर्स पहिलेच्या ताब्यात दिली.

Web Title: 44 thousand rupees lost in a minute in 20 minutes back