शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:32 IST

Crime News : गुंजा वाचव, कुणाला तरी बोलव... हे शब्द चंदौलीतील गुंजा यादवचे आहेत. जी आपल्या बहिणीची आठवण करून रडते.

चंदौली : जवळपास ४० पोलीस आले होते. आम्ही त्यावेळी गच्चीवर होतो, हे लोक थेट घरात घुसू लागले. आम्ही गेट बंद करण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर या लोकांनी गेट ढकलून उघडला. आम्ही विरोध केला असता त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर एका लेडीज आणि जेंट्स कॉन्स्टेबलने मला पकडले. जेव्हा दीदीने मला पाहिले तेव्हा तिने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या खोलीत धाव घेतली आणि दरवाजा बंद केला. मात्र, गेट उघडून तिला मारले. थोडा वेळ ती मला फोन करत राहिली. गुंजा वाचव, कुणाला तरी बोलव... हे शब्द चंदौलीतील गुंजा यादवचे आहेत. जी आपल्या बहिणीची आठवण करून रडते आहे. हिस्ट्री शीटर कन्हैया यादवच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन्ही मुलींना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे निशाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताची बहिण गुंजा हिने केला आहे.

असं करू नको, दीदीचं लग्न होणार आहे...या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गावकरी आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. एसएचओला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. या घटनेने उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. घटना चंदौलीच्या मनराजपूर गावातील आहे. मृताची बहीण गुंजा कॅमेऱ्यासमोर म्हणाली, 'आम्ही पोलिसांना सांगत होतो की, असे करू नका साहेब, आमची परीक्षा आहे... दीदींचे लग्न होणार आहे. असे असूनही त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर खोलीतून आवाज येणे बंद झाले. एका हवालदाराने खाली खुर्ची नेली. मी म्हणाले, तुम्ही काय करत आहात. त्यावेळी मी त्याचा हात धरला तेव्हा मला रक्त लागल्याने झटकून दिले. त्यानंतर तो आत गेला. 5-10 मिनिटांनी सगळे बाहेर आले आणि म्हणाले, या मुलीला सोड. मग सगळे निघून गेले. तो निघून गेल्यानंतर 10 सेकंदातच आम्ही त्या खोलीत पोहोचलो. दीदी पंख्याला लटकत होती आणि जमिनीला स्पर्श करत तिचा पाय वाकले होते. एका वाक्यात गुंजा यादव म्हणाली की, पोलीस आले तेव्हा आम्ही दोघी बहिणी होतो. त्याच लोकांनी बहिणीला मारलं... ती रडतच राहिली. जेव्हा हे लोक आम्हाला सोडून जाऊ लागले.. आम्ही पळत जाऊन पहिले तर दीदीला साडीच्या हलक्या गाठीने बांधले होते. तिचा पाय जमिनीला स्पर्श करून वाकलेला होता. एका हाताने मी गाठ सोडली, ती खूप हलकी बांधली होती. दीदीला तिथे आडवे केले होते. दुचाकीस्वाराला विनंती केली.  मात्र, त्याने मोबाईल न देता पळ काढला. त्यानंतर आजीच्या मदतीने गावकऱ्यांना बोलावण्यात आले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मानेजवळ ओरखडे आहेतचंदौलीचे एसपी अंकुर अग्रवाल यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात घशाजवळ एक जखम आणि डाव्या जबड्याखाली छोटीशी जखम दिसून आली आहे. याशिवाय शरीरावर अंतर्गत किंवा बाहेरून कोणतीही जखम झालेली नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अज्ञात असे लिहिले आहे. व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे, व्हिसेरा पाठवला जाईल, अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी कारवाई केली जाईल. मीडियामध्ये बलात्काराची चर्चा होती. मात्र, कोणत्याही अंतर्गत भागाला दुखापत झालेली नाही.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेश