सोमाटणे फाटा येथे व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:00 PM2019-03-28T14:00:17+5:302019-03-28T14:01:01+5:30

विश्वास वसंत मुऱ्हे यांनी प्लॅट विकलेले २५ लाख, व पाण्याचे टँकरचे व सोने गहाण ठेवून १५ लाख अशी ४० लाख रुपये रक्कम २००० रुपयांच्या नोटामध्ये बदलून देण्यासाठी तयार ठेवले. 

40 lakh cheating with businessman at Somatane Phata | सोमाटणे फाटा येथे व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक 

सोमाटणे फाटा येथे व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक 

Next

शिरगाव : सोमाटणे येथे संगनमत करून पाच टक्क्याने पैसे वाढवून देऊ असे खोटे सांगून हातचलाखी करून पैशाच्या बदल्यात कागदी बंडल बॅगेत ठेवून एकाची तब्बल ४० लाखांची फसवणूक करण्यात आली. सादर घटना मंगळवार दि २६ रोजी सोमाटणे परिसरात घडली. 
विश्वास वसंत मुऱ्हे (वय २९) रा. सत्यम निवास, शिरगाव रोड, सोमाटणे फाटा, ता. मावळ असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून आरोपी लालकार कृष्णा झिंगरे रा. ६०३ दौलत नगर सनसिटी रोड, आनंदनगर सिंहगड, पुणे यास तळेगाव पोलिसांनी अटक केली असून त्याचे इतर साथीदार दिपकभाई, संतोष व शाम ( पूर्ण नाव माहित नाही) फरार आहेत. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरच्या पार्टीकडे १०० रुपयांच्या नोटा आहेत. त्यांना २००० रुपयांच्या नोटांमध्ये बदल करून हव्या आहेत यासाठी पाच टक्के कमिशन देखील देण्यास तयार आहेत असे आमिष लालकार झिरंगे याने मुऱ्हे यांना दाखवले व सुरुवातीला विश्वास बसण्यासाठी २००० रुपयांच्या दोन लाख रुपये बदलून दिले. त्याच्या बदल्यात १०० रुपयांच्या दोन लाख व कमिशन २० हजार रुपये अशी रक्कम देऊ केली. 
त्यानंतर मुऱ्हे यांनी प्लॅट विकलेले २५ लाख, व पाण्याचे टँकरचे व सोने गहाण ठेवून १५ लाख अशी ४० लाख रुपये रक्कम २००० रुपयांच्या नोटामध्ये बदलून देण्यासाठी तयार ठेवले. 
आरोपीने नोटा तपासण्याचा बहाणा करून व हातचलाखी करून नोटा एका सुटकेस मध्ये भरल्या व सुटकेस मुऱ्हे यांच्या कपाटात ठेवून बदली रक्कम व कमिशन असे ४२ लाख घेऊन येतो असे सांगितले. व आरोपी बाहेर पसार झाले. दरम्यान मुऱ्हे यांना संशय आल्याने त्यांनी कपात तोडले असता सुटकेसमध्ये २००० हजारांच्या नोटा ऐवजी कागद आढळून आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लाखात येताच त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात   तक्रार दाखल केली. सादर घटने बाबत तळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे अधिक तपस करत आहेत.  

Web Title: 40 lakh cheating with businessman at Somatane Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.