चिमुरडीचे लैंगिक शोषण करून केली हत्या; मृतदेह ठेवला गोणीत लपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:32 IST2020-02-11T15:27:26+5:302020-02-11T15:32:49+5:30

संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील चौकीला घेराव घातला.

4 years girl has sexually assaulted and killed; The body was kept hidden in jute gunny | चिमुरडीचे लैंगिक शोषण करून केली हत्या; मृतदेह ठेवला गोणीत लपून

चिमुरडीचे लैंगिक शोषण करून केली हत्या; मृतदेह ठेवला गोणीत लपून

ठळक मुद्देसंशय येऊ नये म्हणून आरोपी देखील मुलीला शोधात होता. आरोपीचे नाव राजू मिश्रा असं आहे. आरोपीच्या घरात मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजले.

सीतापूर - सीतापूरच्या माहोली कोतवाली भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपीने घरातच मृतदेह पोत्यात ठेवला होता. मात्र, पीडित मुलीचे कुटुंबीय हरवलेल्या मुलीचा शोध घेत राहिले. त्यांच्यासोबत संशय येऊ नये म्हणून आरोपी देखील मुलीला शोधात होता. दरम्यान, आरोपीच्या घरात मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजले. आरोपीचे नाव राजू मिश्रा असं आहे. 

धक्कादायक! पतीनेच सांगितले माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव

परिचितांकडूनच होतोय महिलांवर अत्याचार

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलांवर गुन्हे
माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. माहोलीतील रिछाई चौकी परिसरातील खेड्यातील चार वर्षीय निरागस मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोमवारी सायंकाळी नराधमाने आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. 

यानंतर या नराधमाने तिला ठार मारले आणि मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. कुटुंबियांना मुलगी सापडत नाही म्हणून शोध घेतला. आरोपी देखील मुलीच्या नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेत होता. यानंतर आरोपी राजू मिश्रा यांच्या घरावरुन मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर चौकीला घेराव घातल्याने एकच खळबळ उडाली होती.

एसपी महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, आरोपी राजूला ताब्यात घेण्यात आले असून कारवाई केली जात आहे. चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून आरोपीने तिची हत्या केली आहे. ग्रामस्थांना समजावून घातलेला घेराव हटविण्यात आला.

Web Title: 4 years girl has sexually assaulted and killed; The body was kept hidden in jute gunny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.