शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

आंतरराष्ट्रीय बाईक रेसरच्या हत्येला ४ वर्षानंतर लागलं वेगळं वळण, पत्नी निघाली मास्टरमाइंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 19:10 IST

Murder of the international bike racer : यापूर्वी या प्रकरणातील आरोपी संजय कुमार आणि विश्वास एसडी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हे दोघेही बंगळुरू येथील रहिवासी आहेत.

जैसलमेर - 2018 मध्ये, जैसलमेर शहरात आयोजित इंडिया बाइक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरूहून आलेल्या आंतरराष्ट्रीय बाइक रेसर  अस्बाक मौन च्या हत्येप्रकरणी फरार पत्नी सुमेरा परवेझ हिला सायबर सेलच्या मदतीने बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणातील आरोपी संजय कुमार आणि विश्वास एसडी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हे दोघेही बंगळुरू येथील रहिवासी आहेत. काय प्रकरण होतेजैसलमेरचे एसपी भंवर सिंह नाथवत यांनी सांगितले की, मूळच्या केरळ हॉल बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या सुमेरा परवेझने 18 ऑगस्ट 2018 रोजी शाहगढ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यामध्ये तिने सांगितले की, जैसलमेरमध्ये आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी तिचा पती अस्बाक मौन हे त्याचे मित्र संजय कुमार, विश्वास आणि अब्दुल साबीर यांच्यासह जैसलमेरला आले होते. 16 ऑगस्ट रोजी घाटात सरावासाठी गेलेल्या अस्बाकचा वाळवंटात भूक आणि तहानने मृत्यू झाला. अहवालावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.मुलाचा अपघात झाल्याचा आईला संशयदुसरीकडे, मृत अस्बाक मौनची आई आणि भावाने अपघातात मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करणारी तक्रार मांडली. त्याचवेळी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी अस्बाकचा मृत्यू मानेला मार लागल्याने झाल्याचे सांगितले. पोलिसांनी बारकाईने तपास केला असता हे प्रकरण खुनाचे असल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या 3 वर्षांनंतर, 2021 मध्ये, पोलिसांनी घटनेचा खुलासा केला आणि मृताचे दोन मित्र संजय कुमार आणि विश्वास एसडी यांना अटक केली. मात्र मृताची पत्नी पळून गेली. 

मृताची पत्नी सुमेरा परवेझ आणि अब्दुल साबीर यांच्याविरुद्ध २९९ सीआरपीसी अंतर्गत आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. दोघांच्या शोधात अनेकवेळा पथक पाठवले, पण यश मिळाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत एसपी भंवर सिंग यांनी नवीन टीम तयार केली आणि विशेष सूचना देऊन सायबर सेलचे प्रभारी भीमराव सिंग यांना बंगळुरूला पाठवले. ज्याने आपल्या सायबर कौशल्याच्या जोरावर 13 मे रोजी मुख्य आरोपीला बंगळुरू येथून अटक केली. आरोपीस कोर्टमध्ये हजर केल्यानंतर कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान