शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पैसे उकळण्याच्या उद्देशाने ४ वर्षीय मुलाचे अपहरण; मुंबईहून युपीला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 21:45 IST

Kidnapping Case : अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पैसे उकळविण्याच्या उद्देशाने चार वर्षाच्या मुलाचे अपहरण करून केले. तसेच त्याला मुंबईवरून पळवून नेण्याच्या बेतात असलेल्या अपहरणकर्त्याला नाशिकरोड पोलिसांनी मुलासह शिताफीने ताब्यात घेऊन उधळला आहे. अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.८ नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ठक्कर बाप्पा कॉलनी, इंदिरा नगर, चेंबूर, मुंबई येथून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाणे मुंबई या ठिकाणी भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा चार वर्षाच्या मुलाला घेऊन मुंबईहून रेल्वेने नाशिकच्या दिशेने गेला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी समजल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या दिशेच्या सर्व पोलिस स्टेशन व वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली. अपहरणकर्ता ४ वर्षाच्या मुलाला घेऊन नाशिकरोड परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी स्वतः लक्ष घालून पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सूचना दिल्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तत्काळ नाशिकरोड पोलिस ठाण्याचे विशेष पथक तयार करून रेल्वे स्टेशन, बसस्थानक व इतर ठिकाणी पाठवले. या पथकातील पोलीस अमलदार कैलास थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली की, देवी चौक येथे अनोळखी इसम लहान मुलास घेऊन संशयित रित्या फिरत आहे. ही माहिती मिळताच व.पो.नि शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, राकेश बोडके, निलेश विखे यांनी देवी चौक परिसरात चार वर्षीय मुलाला घेऊन फिरणाऱ्या रामपाल उदयभान तिवारी (रा. बसंतपुरराजा, उत्तर प्रदेश) यास देवीचौक, सराफ बाजार येथून ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चार वर्षाच्या मुलाच्या आई-वडिलांकडून 50 हजार रुपये मिळवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याचे कबूल केले. तसेच तो त्या बालकाला घेऊन उत्तर प्रदेश येथे जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. मुंबईवरून पोलीस हवालदार सुनील भोसले आणि अजित कावळे, अपहरण झालेल्या मुलाचे वडील यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली व अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. यावेळी अपहरण झालेल्या मुलाचे वडील चार वर्षाच्या मुलाला जवळ घेऊन ओक्साबोक्शी रडू लागले.नाशिकरोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारा गजाआड केला गेला. या उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस आयुक्त दीपक पांडये, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांनी कौतुक केले. या गुन्ह्यातील संशयित व अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसMumbaiमुंबईNashikनाशिकArrestअटक