मुंबई - बदलापूरच्या शाळेत लहानग्या विद्यार्थिनीवरील अत्याचाराची घटना अजूनही समाजमनाला अस्वस्थ करीत असताना तसाच प्रकार मुंबईत मालाडच्या शाळेत घडला आहे. या शाळेतील ३५ वर्षीय शिपायाने चार वर्षाच्या मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपीसह शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
ही घटना १२ जानेवारीला घडली होती. मात्र, मुलीने अलीकडेच पालकांना सांगितल्याने त्यांनी ६ फेब्रुवारीला तक्रार केली. हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळेच्या सीईओने केल्याचा आरोप आहे. बदनामीच्या भीतीने शाळेच्या सीईओने या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून मुलीच्या पालकांना दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
कोण आहेत आरोपी ?
शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (३०) आणि शाळेचा सीईओ अनंत यज्ञीक (६५) यांच्या विरोधात पोलिसांनी बीएनएस कलम ७४, ३५१ (२) आणि पोक्सो कलम १०,१७,२१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संतापाची लाट
शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर मालाड परिसरातील पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करून प्रशासनावरही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
व्यवस्थापनाचीही चौकशी
मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी नोंदी आणि शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेचीही चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Web Summary : In Mumbai, a school peon abused a four-year-old girl. The accused peon and the school's CEO have been arrested after the parents filed a police complaint. The CEO allegedly tried to suppress the incident, leading to his arrest along with the peon. Police investigation is underway.
Web Summary : मुंबई में, एक स्कूल के चपरासी ने चार साल की बच्ची के साथ दुर्व्यवहार किया। माता-पिता द्वारा पुलिस में शिकायत दर्ज कराने के बाद आरोपी चपरासी और स्कूल के सीईओ को गिरफ्तार कर लिया गया है। सीईओ पर कथित तौर पर घटना को दबाने की कोशिश करने का आरोप है, जिसके कारण उसे चपरासी के साथ गिरफ्तार किया गया। पुलिस जांच जारी है।