खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:50 IST2019-07-24T12:45:27+5:302019-07-24T12:50:25+5:30
पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
पनवेल - खारघर शहरात २० वर्षीय तरुणीवर अज्ञात इसमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री ९.१२ वाजता घडली .शहरातील पापडीचा पाडा याठिकाणी हा प्रकार घडला. तरुणीने आरडाओरडा केल्यावर संबंधित इसम घटनास्थळावरून पसार झाला.
तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यांनतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खारघर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेने महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. खारघरसारख्या शहरात अशाप्रकारची घटना घडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पापडीचा पाडा या परिसरातच केंद्रीय शीघ्र कृती दलाचे केंद्र देखील आहे.
खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2019