मुंबई : चार वर्षांच्या बालिकेवर तिच्या शिक्षिकेने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कांदिवलीत घडला. बालिकेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंकी (नावात बदल) ही कांदिवली पश्चिमेतील शाळेत प्री प्रायमरी वर्गात शिकते. तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरला पिंकीच्या गुप्तांगामध्ये जळजळ होऊन त्रास होऊ लागला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता शिक्षिकेने स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केल्याचे पिंकीने सांगितले. तर, २४ तारखेला पीडिता आणि शिक्षिका एकत्र बाहेर गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत नसून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिक्षिकेकडून चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:49 IST