शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
4
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
5
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
6
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
7
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
8
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
9
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
10
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
11
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
12
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
13
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
14
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
15
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
16
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
17
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
18
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
19
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
20
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

३७ लाख दे अन् निघून जा! बलात्काराच्या आरोपीकडून पोलिसाने घेतली लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:50 IST

Bribe Case : भरत मुंढे  (३३) असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

मुंबई - बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तब्बल सात लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने सोमवारी अटक केली. भरत मुंढे  (३३) असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या नातेवाईकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढे याने या तरुणाकडे ३७ लाखांची मागणी केली. यातील पाच लाख स्वतःसाठी, दोन लाख वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी आणि ३० लाख तक्रारदार तरुणीला देण्यात येतील असे मुंढे याने या तरुणाला सांगितले. इतकी मोठी रक्कम आणणार कुठून? असा प्रश्न पडल्याने या तरुणाने मुंढे याला होकार देत त्याच्याविरोधात वरळीतील एसीबीच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.एसीबीच्या पथकाने या तरुणाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यानुसार सोमवारी सापळा रचला. या तरुणाकडून सात लाख रुपये घेताना भरत मुंढे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. मुंढे याच्याविरुद्ध एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि ७अ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अधिक चौकशी सुरु असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक